संपादकीय धोरण
वाचकांना अचूक, संतुलित आणि वेळेवर बातमी देणे हे राष्ट्ररूपचे पहिले काम आहे. त्यासाठी आम्ही खालील नियम पाळतो.
अचूकता व तपासणी
- प्रसिद्ध होणारी प्रत्येक बातमी संपादकीय विभाग तपासतो. नावे, आकडे, तारखा व ठिकाणे शक्य तितक्या मूळ स्रोताकडून पडताळली जातात.
- आरोप किंवा दावा असलेली बातमी "दावा" म्हणूनच दिली जाते आणि शक्य असेल तेव्हा संबंधित व्यक्तीची बाजूही मांडली जाते.
- बातमी व मत वेगळे ठेवले जाते. अग्रलेख व लेख "विचार" विभागात स्पष्टपणे दिले जातात.
स्रोत व श्रेय
- सरकारी विभाग, पोलीस, न्यायालये, संस्था व व्यक्तींच्या अधिकृत निवेदनांचा स्रोत बातमीत नमूद केला जातो.
- सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित बातमीत मूळ खात्याचे नाव व मूळ पोस्टचा दुवा दिला जातो. इतरांचे फोटो किंवा व्हिडिओ केवळ परवानगी असेल तेव्हाच, श्रेयासह वापरले जातात.
- संकेतस्थळावरील काही बातम्यांचा सारांश छापील अंकातील बातमीवरून तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार होतो. अशा मजकुराची जबाबदारी संपादकीय विभागाची आहे.
दुरुस्ती धोरण
चूक आढळल्यास ती लवकरात लवकर दुरुस्त केली जाते. महत्त्वाची दुरुस्ती असल्यास बातमीत तसा उल्लेख केला जातो. दुरुस्ती किंवा तक्रारीसाठी roopesh.raskar@gmail.com वर लिहा किंवा संपर्क पान पाहा.
जबाबदारी
पीआरबी कायदा १८६७ नुसार संपादक रूपेश चंद्रशेखर रासकर प्रसिद्ध मजकुरासाठी जबाबदार आहेत. RNI क्रमांक MAHMAR/2023/89884. सर्व वाद-विवाद पुणे न्यायालयीन कक्षेत.
